मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2011 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुणे ते अकोला प्रवास - एक विचार

नमस्कार मित्रांनो, आज पुष्कळ दिवसानंतर लिहायला घेतलंय. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा!  आज मला थोड्या वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. मी काही दिवसांपूर्वी अकोल्याला जातांना मला ऑफिस मध्ये उशीर झाल्यामुळे माझी ट्रेन सुटली. त्यामुळे मग मी बस ने जायचा विचार केला. मला रात्री वेळेवर तिकीट मिळेना. मग मी शिवाजीनगर बस स्थानकावर गेलो. तेंव्हा मला पुणे ते औरंगाबाद अशी 'शिवनेरी' बस मिळाली. फार बरे वाटले. कमीत कमी ६ तास तरी चांगली झोप होईल म्हणून थोडा खुश झालो. पुढे पहाटे औरंगाबाद ला उतरल्यावर परत पुणे-अकोला लाल डब्बा गाडी मिळाली. रात्रीच्या वेळेस औरंगाबादला ती बर्यापैकी खाली झाली होती व मला खिडकी शेजारी जागा मिळाली.  मग मी जेंव्हा विचार केला तेंव्हा वाटले की शिवनेरी बस औरंगाबाद-अकोला का नाही? का म्हणून शिवनेरी बसेस केवळ मुंबई व पुणे ह्या शहरांच्या आजूबाजूला चालतात? पुणे-अकोला-नागपूर असा प्रवास करणारे कितीतरी प्रवासी आहेत. त्यामुळेच पुणे-नागपूर अशा कितीतरी खाजगी बसेस रोज चालतात. सध्या स्थितीत मुंबई-पुणे, पुणे-कोल्हापूर, पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक अशा ठिकाणी शिवनेरी बसेस आहेत. शिव...

अर्जुन - प्रत्येक मराठी तरुणाने व पालकांनी बघावा असा चित्रपट

नमस्कार  मित्रांनो, मी आज 'अर्जुन' हा चित्रपट पहिला. प्रत्येक मराठी मुलाने व त्यासोबत पालकांनी पाहावा असा हा चित्रपट आहे. एक हुशार मराठी मुलगा समाजनिर्मित बंधने झुगारून कसा व्यवसाय व धंदा करतो व त्यात कुठल्या अडचणी येतात व त्यात तो मुलगा कसा यशस्वी होतो असा हा एक संपूर्ण चित्रपट आहे. त्यात मसाला आहे - रोमान्स आहे, मारामारी आहे, मस्त गाणे व सुंदर लावणी आहे व सर्वांत महत्त्वाचा असा एक संदेश आहे.  हा चित्रपट बॉम्बे स्टोक एक्स्चेंज मध्ये मोठ्या स्क्रीन वर दाखविला गेला असे मी पेपर मध्ये वाचले आहे - प्रथमच एक चित्रपट व तोही मराठी चित्रपट इथे स्क्रीन केल्या गेला हेही नसे थोडके.  मराठी तरुणायीला चांगले मार्गदर्शन व थोडी मदत मिळाल्यास तो काय करू शकतो हे (एक फिल्मी स्तयीलने) दाखविले आहे व ते खरे असेच आहे. त्यात दाखविलेल्या गोष्टी म्हणजे मराठी उद्योजकांनी / व्यावसायिकांनी न घाबरता उद्योग / व्यवसाय उभारावा व करावा. त्यात यशस्वी होण्यासाठी आपले नेटवर्क चांगले ठेवावे. गरज असेल तिथे सम, दंड, भेद ह्याचा उपयोग करावा व आपला धंदा यशस्वी करावा. तसेच स्पर्धेला घाबरू नये. 'आपले टार्...

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो, मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले. अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात. १. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भि...

| वर्हाडातील शेतकरी व ओर्गानिक उत्पादने |

नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर लिहितोय.. मध्ये थोडा बिझी झालो होतो ऑफिस कामामध्ये. मी आजच एक बातमी वाचली. काही दिवासंपुरीव (३१ मे २०११ ) अकोला शहरात 'Organic Food and Taste Festival' करण्यात आला व त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ह्या फेस्टिवल मध्ये शेतकरी लोकांनी - जे शेतकरी organic उत्पन्न घेतात - त्यांनी वेगवेगळे स्टोल्स लावले होते. येणाऱ्या लोकांना ते organic फूड दाखवत होते व ते काय हे समजून सांगत होते. शिवाय स्टोल्स वर त्यांनी त्या organic फूड पासून बनविलेले विविध पदार्थ विकायला ठेवले होते. त्या पदार्थांना सुद्धा खूप प्रतिसाद मिळाला. कितीतरी कुटुंबांनी ह्या ओर्गानिक अन्नाविषयी समजावून घेतले व आपल्या चील्ल्यापाल्यान्सोबत स्तौल्स च्या खमंग खाण्यावर ताव मारला. अकोला शहरातून ह्या शेतकऱ्यांना ६ लाखांची आवक झाली. ह्या अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या डोमेस्टिक बाजारात organic फूड ला असलेली चांगली मागणी दाखविते. आपल्या महाराष्ट्रातील व विशेषतः विदर्भातील गरीब शेतकऱ्यांनी ह्यातून बोध घेऊन organic फूड चे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच हे फूड आपल्याला हवाबंद ...

|| मायमराठी - सद्यस्थिती व प्रगतीचे विवेचन !!

नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलूयात. खूप दिवसांपासून माझ्या मनात हा विषय आहे. मी ह्याच्यावर विचार करतो आहे, पण काही उपाय मिळत नव्हता. मग लक्षात आले कि ह्याला एक असा काही उत्तर नाहीये. आहेत काही उपाय पण ते कोणतेही १००% उपयुक्त नाहीत... तर ते सर्व उपाय सोबत अमलात आणावे लागतील.  आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो - मराठी भाषेला कोणी वाली उरला नाही किंवा ती काही दिवसांत इतिहासजमा होणाच्या मार्गावर आहे. वगैरे वगैरे.. त्यावर काही लोक विरोध करतांना म्हणतात की आपल्या मराठी भाषा मारणार नाही तर ती वाढत जाईल.. फक्त शहरातले लोक इंग्रजी बोलतात पण संपूर्ण ग्रामीण भाग अजूनही मराठी बोलतो वगैरे वगैरे... मला वाटत की ह्या दोन्ही गोष्टी काही अंशी चुकीच्या आहेत व काही अंशी बरोबर! मराठी भाषिकच  कितीतरी लोक घोळक्यांत असतांना मराठी न बोलता इतर भाषा बोलतात, हे मी पहिले आहे. तसेच मराठी भाषेबरोबरच मराठी भाषिकांचा विकास करणे हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. आज आपण बघाल की बाहेर रस्त्याच्या कडेला किंवा कोलेज मध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जर ५-१० लोक जमलेले असतील तर ते ब...

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

विश्वकापाची मोहीम फत्ते! सचिनला मनाचा मुजरा!!

नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झालेत मी ब्लोग्स्पोत वर आलो नाही. थोडा ऑफिस मध्ये बिझी होतो व शिवाय क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून तर मग खूपच बिझी झालो :) सर्वप्रथम आपण भारतीय टीमचे अभिनंदन करूयात... भारताने २८ वर्षांनतर पुन्हा मिळविलेला हा विश्व चषक, त्यासाठी जिंकलेली प्रत्येक मैच ही नेहमी लक्षात राहील. मुख्यत्वेकरून उपांत्य फेरीतील पाकिस्तान विरुद्धचा सामना तर विशेषच!  शिवाय सचिन चा हा विश्वकप, त्याची जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणा हा तर खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. संपूर्ण भारताला हे विश्वकप जिंकून कृतकृत्य झाल्यासारखे वाटत असणार.  ह्या सामन्यात २ गोष्टी प्रकर्षाने जाणवल्यात:  १. सचिन ची जिद्द - सचिन हा एक वादातीत श्रेष्ट खेळाडू आहे. तो आज चाळीशीच्या जवळ असून देखील त्याची खेळण्यातली जिद्द, कामगिरी, चपलता हे गुण पाहून कोणीही थक्क होईल. इतके दिवस खेळून ऐन विशीतल्या तरुणासारखी कामगिरी करणे हे काही कुण्या ऐर्या गैर्याचे काम नव्हे. शिवाय त्याने प्रत्येकदा दाखवलेली प्रामाणिकपणा हा गुण खरोखर आपण सर्वांनी घेण्यासारखा आहे.  सचिनला आपणा सर्वांकडून खूप खूप अभिनंदन!  २. धोनी...

जपान आणि ११ मार्चचा भूकंप

नमस्कार मित्रांनो.... जपानच्या ईशान्य भागात रिश्टर स्केल वर ९.० घटकांचा भूकंप आला... आणि तेथील लोकांवर काळ आला.... बापरे किती हानी... किती नुकसान!! तेथील फुकुशिमा व सेनदाय सारखे भाग तर टी. व्ही / इंटरनेट वर पाहूनही घाम फुटतो... संपूर्ण शहरे बेचिराख झाले... रस्त्याला भेगा पडल्या... घर वाहून गेलेत, गाड्या वाहून गेल्यात, हजारो लोक मेलेत, जे वाचले, त्यांना दुखापती झाल्यात... होत्याचे नव्हते झाले.... जपान हा चिंचोळा देश चीन आणि अमेरिकेच्या मध्ये पासिफिक महासागरात वसला आहे... तो भूकंप-क्रियाशील (high seismic active region)  भागामध्ये वसला आहे.. तसा ह्या देशाला छोटे मोठे भूकंप होताच असतात.. त्यात लोकांनाही काही भीती वाटत नाही.. येथील घरे, कार्यालये, शहरे, हे भूकंपरोधक यंत्रणेने युक्त असतात..  पण त्यांनीही कधी येवढा भयंकर भूकंप व सुनामी येईल अशी कल्पना केली नसेल... ह्या घटनेने काही गोष्टी मात्र प्रकर्षाने समोर आल्यात... १. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे.  माणसाने कधीही निसर्गाला ग्रंतेड पकडू नये... जेवढे जीवन निसर्ग वर्षानुवर्ष देतो तेवढेच तो काही क्षणातच परत...