नमस्कार, मी आज सकाळच्या ई आवृत्तीतील बातमी वचली आणि मन सुन्न झाले. हे राज्यकर्ते कुठल्या थराला जाऊ शकतात तेच काळात नाहीये. अकोला, नागपूर आणि संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याने कधी पर्यंत हा अन्याय सहन करायचा? विदर्भात सीकलसेल रुग्णांची सन्ख्या 60 % असतांना आणि नागपूर, अकोला, ऑरगाबाद आणि धुळे इ थे प्रयोगशाळा मन्जुर असतांना आता या प्रयोगशाळा मुंबई आणि पूणे ईथे हलवण्यात् येत आाहेत. का म्हणून? सिकलसेल हा रोग सहसा गरीब आणि आदिवासी लोकांमध्ये आढळून येतो. मग ह्या रुग्णांना चाचण्यांसाठी मुंबई आणि पुण्याला पाठवून हे राज्यकर्ते आणि प्रशासन काय साधणार आहे? बातमी खाली देत आहे: रुग्ण विदर्भात; प्रयोगशाळा मात्र मुंबई, पुण्यात! सिकलसेल या अनुवांशिक आजाराचे अडीच लाख रुग्ण संपूर्ण राज्यात असून, एकट्या विदर्भात याचे प्रमाण दीड लाखांवर पोचले आहे. मात्र, यावरील प्रयोगशाळा पुणे, मुंबईत निर्माण करण्याच्या घाट राज्याच्या आरोग्य विभागाने रचल्याने बाधीत रुग्णांना चाचण्यांसाठी मुंबई, पुण्याची वारी करण्याची वेळ येणार आहे. सद्य:स्थित या आजारा...
Hobaski is a Varhadi word - used in the region around Akola. It means 'Naughty activity' done mainly by small kids.