नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलूयात. खूप दिवसांपासून माझ्या मनात हा विषय आहे. मी ह्याच्यावर विचार करतो आहे, पण काही उपाय मिळत नव्हता. मग लक्षात आले कि ह्याला एक असा काही उत्तर नाहीये. आहेत काही उपाय पण ते कोणतेही १००% उपयुक्त नाहीत... तर ते सर्व उपाय सोबत अमलात आणावे लागतील. आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो - मराठी भाषेला कोणी वाली उरला नाही किंवा ती काही दिवसांत इतिहासजमा होणाच्या मार्गावर आहे. वगैरे वगैरे.. त्यावर काही लोक विरोध करतांना म्हणतात की आपल्या मराठी भाषा मारणार नाही तर ती वाढत जाईल.. फक्त शहरातले लोक इंग्रजी बोलतात पण संपूर्ण ग्रामीण भाग अजूनही मराठी बोलतो वगैरे वगैरे... मला वाटत की ह्या दोन्ही गोष्टी काही अंशी चुकीच्या आहेत व काही अंशी बरोबर! मराठी भाषिकच कितीतरी लोक घोळक्यांत असतांना मराठी न बोलता इतर भाषा बोलतात, हे मी पहिले आहे. तसेच मराठी भाषेबरोबरच मराठी भाषिकांचा विकास करणे हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. आज आपण बघाल की बाहेर रस्त्याच्या कडेला किंवा कोलेज मध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जर ५-१० लोक जमलेले असतील तर ते ब...
Hobaski is a Varhadi word - used in the region around Akola. It means 'Naughty activity' done mainly by small kids.