नमस्कार मित्रांनो,
मी आज 'अर्जुन' हा चित्रपट पहिला. प्रत्येक मराठी मुलाने व त्यासोबत पालकांनी पाहावा असा हा चित्रपट आहे. एक हुशार मराठी मुलगा समाजनिर्मित बंधने झुगारून कसा व्यवसाय व धंदा करतो व त्यात कुठल्या अडचणी येतात व त्यात तो मुलगा कसा यशस्वी होतो असा हा एक संपूर्ण चित्रपट आहे. त्यात मसाला आहे - रोमान्स आहे, मारामारी आहे, मस्त गाणे व सुंदर लावणी आहे व सर्वांत महत्त्वाचा असा एक संदेश आहे.
हा चित्रपट बॉम्बे स्टोक एक्स्चेंज मध्ये मोठ्या स्क्रीन वर दाखविला गेला असे मी पेपर मध्ये वाचले आहे - प्रथमच एक चित्रपट व तोही मराठी चित्रपट इथे स्क्रीन केल्या गेला हेही नसे थोडके.
मराठी तरुणायीला चांगले मार्गदर्शन व थोडी मदत मिळाल्यास तो काय करू शकतो हे (एक फिल्मी स्तयीलने) दाखविले आहे व ते खरे असेच आहे. त्यात दाखविलेल्या गोष्टी म्हणजे मराठी उद्योजकांनी / व्यावसायिकांनी न घाबरता उद्योग / व्यवसाय उभारावा व करावा. त्यात यशस्वी होण्यासाठी आपले नेटवर्क चांगले ठेवावे. गरज असेल तिथे सम, दंड, भेद ह्याचा उपयोग करावा व आपला धंदा यशस्वी करावा. तसेच स्पर्धेला घाबरू नये. 'आपले टार्गेट जेवढे मोठे तेवढाच तो मिळविल्याचा आनंद मोठा!'
ह्या चित्रपटातील गोष्ट साधी पण खूप मनोरंजक आहे. ते पाहून आणखी मराठी तरुणांना धंदा /व्यवसाय करायची इच्छा झाली पाहिजे. तसेच तो यशस्वी होण्यासाठी स्पुर्थी देखील मिळायला हवी.
तेंव्हा मित्रांनो, हा चित्रपट पहा - चित्रपट गृहात / मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन पहा.... पण पहा... बघा पटते का.
राम राम,
अकोलकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा