नमस्कार मित्रांनो, आज पुष्कळ दिवसानंतर लिहायला घेतलंय. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा! आज मला थोड्या वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. मी काही दिवसांपूर्वी अकोल्याला जातांना मला ऑफिस मध्ये उशीर झाल्यामुळे माझी ट्रेन सुटली. त्यामुळे मग मी बस ने जायचा विचार केला. मला रात्री वेळेवर तिकीट मिळेना. मग मी शिवाजीनगर बस स्थानकावर गेलो. तेंव्हा मला पुणे ते औरंगाबाद अशी 'शिवनेरी' बस मिळाली. फार बरे वाटले. कमीत कमी ६ तास तरी चांगली झोप होईल म्हणून थोडा खुश झालो. पुढे पहाटे औरंगाबाद ला उतरल्यावर परत पुणे-अकोला लाल डब्बा गाडी मिळाली. रात्रीच्या वेळेस औरंगाबादला ती बर्यापैकी खाली झाली होती व मला खिडकी शेजारी जागा मिळाली. मग मी जेंव्हा विचार केला तेंव्हा वाटले की शिवनेरी बस औरंगाबाद-अकोला का नाही? का म्हणून शिवनेरी बसेस केवळ मुंबई व पुणे ह्या शहरांच्या आजूबाजूला चालतात? पुणे-अकोला-नागपूर असा प्रवास करणारे कितीतरी प्रवासी आहेत. त्यामुळेच पुणे-नागपूर अशा कितीतरी खाजगी बसेस रोज चालतात. सध्या स्थितीत मुंबई-पुणे, पुणे-कोल्हापूर, पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक अशा ठिकाणी शिवनेरी बसेस आहेत. शिव...
Hobaski is a Varhadi word - used in the region around Akola. It means 'Naughty activity' done mainly by small kids.