मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मराठीतील काही मस्त ब्लॉग्स !!

मित्रांनो, मी काही वारंवार लिहिणारा ब्लॉगर नाही हे तुम्हाला कळलंच असेल. तरी ज्यांना मराठी ब्लॉग्स वाचण्याची आवड आहे त्यांच्या साठी आज काही इतर सुंदर मराठी ब्लॉग्स बद्दल इथे माहिती आणि दुवे देत आहे. ते बघा, वाचा आणि आवडल्यास इथे कंमेंट करा! १. सोप्या मराठी भाषेतून बिझनेस, तंत्रज्ञान आणि करिअरसाठी उपयुक्त  ऑनलाईन कोर्सेस शिकण्याचे एकमेव आपल्या हक्काचे ठिकाण  - नेटभेट  २. इतिहासाबद्दल मराठी ब्लॉग : इतिहासाची सुवर्णपणे   ३. आपल्या भोवताली घडणाऱ्या गोषीतींबद्दल सम्यक लेखन आणि प्रतिक्रिया : सम्यक भान  ४. पुष्कळ वेगवेगळ्या गोष्टींवर माहिती आणि उपयुक्त माहिती असलेला ब्लॉग : मिसळपाव  ह्यात लेखमाला, पाककृती, भटकंती आणि इतर प्रकारांवर भरपूर  लेख आणि माहितीचा खजिना आहे. ५. मस्त चविष्ट आणि छान पाककृतींची बघा : चकली    ६. भरपूर सामान्य ज्ञान आणि उपयुक्त माहितीसाठी चाळा  : मराठी वारसा .  ७. वेगवेगळ्या मराठती कथा आणि किस्स्यांसाठी बघा : मराठी भुंगा      . खूपच छान आणि मस्त कथा इथे तुम्हाला वाचा...
अलीकडील पोस्ट

महाराष्ट्रातील ऑगस्ट २०१९ मधील पूर!

नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचे या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या सातारा, कोल्हापूर आणि सांगली या काही जिल्ह्यानमध्ये खूप पावसामुळे पूर परिस्थिती ओढवली होती. तेव्हा आपण सगळे जण तिथल्या आपल्या महाराष्ट्रातील बांधवांना धीर आणि शक्ती देव ही देवचारानी ईच्छा ! खूप ठीकानी ह्यांच्यासाठी पैसे जमा करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेंव्हा ज्यांना श्यक्य होईल त्यांनी तिथे मदत करून तिथल्या बांधवांना मदत करावी ही विनंती! धन्यवाद! आपला, होबासराव !

मोर्णा स्वच्छता मिशन : एक नवीन उर्जावान प्रयोग

हॅलो मित्रांनो, मी बरेच दिवसानंतर, नव्हे वर्षानंतर परत आलोय. मधला काळ खूप घडामोडींचा होता. मी यु एस ए ला जाऊन, राहून आलो. खूप खूप काम केल. कंपनीच्या आणि माझ्या खराब काळात परत आलो. काम आता  आहे... असो... काही दिवसांपासून मनाला एक खूप प्रसन्न करणारी गोष्ट घडली / घडतेय. अकोलकर एकत्र येऊन मोर्णा स्वच्छता मिशन राबवतायत. आणि यशस्वी पाने राबवतायत.... नवीन जिल्हाधिकारी श्री. आस्तिक कुमार पांडे. आणि आमदार श्री. रणजित पाटील यांनी एक नवीन कल्पना साकारली. जलकुंभी आणि काचार्यानी तुंबलेली अकोल्याची जीवनवाहिनी मोर्णा नदीला स्वच्छ करायची, तिला पुन्हा जिवंत करायची. मागच्या ५ सप्ताहांपासून सुरु झालेली हे कार्य बघता बघता मोठे झाले. आधी राजकारणी, कार्यकर्ते आणि शासकीय कर्मचारांपासून सुरु झालेल्या ह्या कार्याला हळू हळू सामान्य नागरिक हात लावू लागले आहेत. एवढेच नाही तर श्री. मोदींच्या मन कि बात मध्ये अकोल्याच्या नदी स्वच्छता कार्यक्रमाचा आणि सर्व नागरिकांनी उस्फूर्तपणे दिलेल्या मदतीचा उल्लेख केला. संपूर्ण महाराष्ट्रात ही गोष्ट बोलल्या गेली, सर्व वर्तमान पार्टरमध्ये ह्याविषयी लेख लिह...

॥ अकोला, वाशीम आणि बुलढाणा परिसराचे काही प्रश्न व त्यावरील काही उपाय ।।

मित्रांनो, मी मागच्या आठवड्यात अकोल्यात जाउन आलो, शिवाय मनोरा, बर्शिताकली पुसद, माहूर हा भाग फिरून आलो. तेंव्हा मला प्रकर्षाने जाणवलेले काही प्रश्न आहेत जे मी इथे मांडतो आहे. ह्यावर मी खूप दिवसांपासून विचार करत होतो व ह्यावर काय उपाय करता येतील हे शोधन होतो. ते उपाय मला सापडले असे म्हणू शकत नाही पण तरीही थोडे बहुत मी जे विचार केले, ते इथे देत आहे. हे उपाय आपल्याला लावून धरावे लागतील व त्यांची मागणी विविध माध्यमांतून करावी लागेल - जसे वृत्तपत्र, टीवि,  राजकीय नेते आणि मंत्र्यांना पत्रे, ई . काही प्रश्न:  १. खारपान पट्टा : अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील जवळ जवळ ८ तालुके ह्यापासून प्रभावित आहेत मुर्तीजापूर, अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापुर, संग्रामपूर, शेगाव, खामगाव इ. तालुक्यांत जमिनीत खारे पाणी लागते. हे अतिशय जड असते व पिण्यास अयोग्य असते. ह्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होऊ शकत नाही. तसेच हे असे क्षारयुक्त किडनीचे आजार बळावतात. अकोट, तेल...

विजयादशमीच्या हार्दिक सुभेच्छा !!

नमस्कार, सर्व मित्र,    मैत्रिणिंना  आणि समस्त मराठी बांधवांना विजयादशमीच्या हार्दिक  सुभेच्छा !!  हा दसरा सर्वांना सुख आणि आनंद घेऊन येवो.  माझ्या अकोलेकर मित्रांनो, ह्या दसर्याला आपण सर्व ठरवूया, की आपण आता अकोल्याला चांगले बनवूयात तसेच अकोल्यावर होणाऱ्या अन्न्यायाविरुद्ध उठून उभे राहूया. चला एक चांगले अकोला शहर बनवूयात.  आपला, अकोलेकर 

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...

जय जय जय महाराष्ट्र माझा !

नमस्कार मित्रांनो , आज 1 मे, 2012 - महाराष्ट्र दिन ! सगळ्या मराठी आणि महाराष्ट्रात  राहणाऱ्या व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांना ह्या दिनाच्या सुभेच्छा ! सर्व  म राठी बंधू आनंदी, उ द्योगी आणि धीट होवोत अशी इच्छा ! जय  महाराष्ट्र! जय  हिंद ! आपला, अकोलकर