मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विजयादशमीच्या हार्दिक सुभेच्छा !!

नमस्कार, सर्व मित्र,    मैत्रिणिंना  आणि समस्त मराठी बांधवांना विजयादशमीच्या हार्दिक  सुभेच्छा !!  हा दसरा सर्वांना सुख आणि आनंद घेऊन येवो.  माझ्या अकोलेकर मित्रांनो, ह्या दसर्याला आपण सर्व ठरवूया, की आपण आता अकोल्याला चांगले बनवूयात तसेच अकोल्यावर होणाऱ्या अन्न्यायाविरुद्ध उठून उभे राहूया. चला एक चांगले अकोला शहर बनवूयात.  आपला, अकोलेकर 

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...

जय जय जय महाराष्ट्र माझा !

नमस्कार मित्रांनो , आज 1 मे, 2012 - महाराष्ट्र दिन ! सगळ्या मराठी आणि महाराष्ट्रात  राहणाऱ्या व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांना ह्या दिनाच्या सुभेच्छा ! सर्व  म राठी बंधू आनंदी, उ द्योगी आणि धीट होवोत अशी इच्छा ! जय  महाराष्ट्र! जय  हिंद ! आपला, अकोलकर

सिकलसेल रुग्ण विदर्भात; प्रयोगशाळा मात्र मुंबई, पुण्यात!

नमस्कार, मी आज सकाळच्या ई आवृत्तीतील  बातमी वचली आणि  मन सुन्न झाले. हे राज्यकर्ते कुठल्या थराला जाऊ शकतात तेच काळात नाहीये. अकोला, नागपूर आणि संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याने कधी पर्यंत हा अन्याय सहन करायचा?   विदर्भात सीकलसेल  रुग्णांची सन्ख्या 60 % असतांना आणि  नागपूर, अकोला, ऑरगाबाद आणि धुळे इ थे प्रयोगशाळा मन्जुर असतांना आता या प्रयोगशाळा मुंबई आणि पूणे ईथे हलवण्यात् येत आाहेत. का म्हणून? सिकलसेल हा रोग सहसा गरीब आणि आदिवासी लोकांमध्ये आढळून येतो. मग ह्या रुग्णांना चाचण्यांसाठी मुंबई आणि पुण्याला पाठवून हे राज्यकर्ते आणि प्रशासन काय साधणार आहे?  बातमी खाली देत आहे:   रुग्ण विदर्भात; प्रयोगशाळा मात्र मुंबई, पुण्यात! सिकलसेल या अनुवांशिक आजाराचे अडीच लाख रुग्ण संपूर्ण राज्यात असून, एकट्या विदर्भात याचे प्रमाण दीड लाखांवर पोचले आहे. मात्र, यावरील प्रयोगशाळा पुणे, मुंबईत निर्माण करण्याच्या घाट राज्याच्या आरोग्य विभागाने रचल्याने बाधीत रुग्णांना चाचण्यांसाठी मुंबई, पुण्याची वारी करण्याची वेळ येणार आहे. सद्य:स्थित या आजारा...