मुख्य सामग्रीवर वगळा

विश्वकापाची मोहीम फत्ते! सचिनला मनाचा मुजरा!!

नमस्कार मित्रांनो,
बरेच दिवस झालेत मी ब्लोग्स्पोत वर आलो नाही. थोडा ऑफिस मध्ये बिझी होतो व शिवाय क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून तर मग खूपच बिझी झालो :)
सर्वप्रथम आपण भारतीय टीमचे अभिनंदन करूयात... भारताने २८ वर्षांनतर पुन्हा मिळविलेला हा विश्व चषक, त्यासाठी जिंकलेली प्रत्येक मैच ही नेहमी लक्षात राहील. मुख्यत्वेकरून उपांत्य फेरीतील पाकिस्तान विरुद्धचा सामना तर विशेषच! 
शिवाय सचिन चा हा विश्वकप, त्याची जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणा हा तर खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. संपूर्ण भारताला हे विश्वकप जिंकून कृतकृत्य झाल्यासारखे वाटत असणार. 
ह्या सामन्यात २ गोष्टी प्रकर्षाने जाणवल्यात: 
१. सचिन ची जिद्द - सचिन हा एक वादातीत श्रेष्ट खेळाडू आहे. तो आज चाळीशीच्या जवळ असून देखील त्याची खेळण्यातली जिद्द, कामगिरी, चपलता हे गुण पाहून कोणीही थक्क होईल. इतके दिवस खेळून ऐन विशीतल्या तरुणासारखी कामगिरी करणे हे काही कुण्या ऐर्या गैर्याचे काम नव्हे. शिवाय त्याने प्रत्येकदा दाखवलेली प्रामाणिकपणा हा गुण खरोखर आपण सर्वांनी घेण्यासारखा आहे. 
सचिनला आपणा सर्वांकडून खूप खूप अभिनंदन! 
२. धोनीची कप्तानी - एका नेत्याकडून, काप्तनाकडून काय अपेक्षा असते, व चांगल्या कप्तानाला आवश्यक असणारे गुण कोणते? ह्या प्रश्नांची उत्तर आपणाला धोनीला पाहिल्यावर लगेच कळतील. शांतपणे विचार करण्याची क्षमता, कोणत्याही दबावाच्या क्षणी त्याला बळी न पडता डोके शांत ठेवून निर्णय घेण्याची क्षमता, आपल्या टीम वर टाकलेला विश्वास, वादग्रस्त पण प्रामाणिक पाने टीमच्या भल्यासाठी घेतलेले निर्णय, आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे व वेळ पडल्यास त्याबद्दलच्या टीकेसाठी तयार असण्याची क्षमता, आताच्या परीस्तीठीवर पूर्ण लक्ष ठेवून निर्णय घेण्याची क्षमता इ. 
मी माझ्या करिअर मध्ये चांगला लीडर होण्यासाठी हे गुण अंगी बांधण्याचा नक्की प्रयत्न करेन! आपण सर्वांनी हे गुण अंगी बनावेत अशेच आहे. तेंव्हा ह्या गुणांमुळे यश मिळते हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी हे आत्मसात करावेत अशी अशा करूयात. 
विश्वकप जिंकल्यानंतर मी पुण्यात जंगली महाराज रोड, डेक्कन ह्या भागात माझी दुचाकी घेऊन गेलो तर बापरे! रस्त्यांवर लोकांचा महापूर, तरुणायीचा जल्लोष! विद्यापीठ रोड, शिवाजी नगर, जंगली महाराज रोड, डेक्कन, विधी महाविद्यालय रोड, भांडारकर रस्ता, सेनापती बापट रोड हे सर्वे रस्त्यावर बेधुंद होऊन नाचणारे तरुण तरुणी, पोलीस, दुचाकी, चारचाकी गाड्या ह्यांनी भरून गेला होता. इथे येवून कोणाचे पाय थरथरले नाही तर नवल. सर्वे जन सचिनच्या व टीम इंडियाच्या नावाने जल्लोष करीत होते. मी येथे मनाने एकदम ताजा तवाना झालो व रात्री ३ च्या सुमारास परत घरी आलो. 
चला टीम इंडियाला परत एकदा अभिनंदन करून मी आता थांबतो. 
सर्व ब्लोगार्स्ना व नेत्तीजान्सला नवीन वर्षाच्या हार्दिक सुभेच्छा! गुडी पडावा आपण सर्वांना ख़ुशी घेऊन येवो ही प्रार्थना! 

धन्यवाद,
अकोलकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो, मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले. अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात. १. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भि...