हॅलो मित्रांनो, मी बरेच दिवसानंतर, नव्हे वर्षानंतर परत आलोय. मधला काळ खूप घडामोडींचा होता. मी यु एस ए ला जाऊन, राहून आलो. खूप खूप काम केल. कंपनीच्या आणि माझ्या खराब काळात परत आलो. काम आता आहे... असो... काही दिवसांपासून मनाला एक खूप प्रसन्न करणारी गोष्ट घडली / घडतेय. अकोलकर एकत्र येऊन मोर्णा स्वच्छता मिशन राबवतायत. आणि यशस्वी पाने राबवतायत.... नवीन जिल्हाधिकारी श्री. आस्तिक कुमार पांडे. आणि आमदार श्री. रणजित पाटील यांनी एक नवीन कल्पना साकारली. जलकुंभी आणि काचार्यानी तुंबलेली अकोल्याची जीवनवाहिनी मोर्णा नदीला स्वच्छ करायची, तिला पुन्हा जिवंत करायची. मागच्या ५ सप्ताहांपासून सुरु झालेली हे कार्य बघता बघता मोठे झाले. आधी राजकारणी, कार्यकर्ते आणि शासकीय कर्मचारांपासून सुरु झालेल्या ह्या कार्याला हळू हळू सामान्य नागरिक हात लावू लागले आहेत. एवढेच नाही तर श्री. मोदींच्या मन कि बात मध्ये अकोल्याच्या नदी स्वच्छता कार्यक्रमाचा आणि सर्व नागरिकांनी उस्फूर्तपणे दिलेल्या मदतीचा उल्लेख केला. संपूर्ण महाराष्ट्रात ही गोष्ट बोलल्या गेली, सर्व वर्तमान पार्टरमध्ये ह्याविषयी लेख लिह...
Hobaski is a Varhadi word - used in the region around Akola. It means 'Naughty activity' done mainly by small kids.