मुख्य सामग्रीवर वगळा

जपान आणि ११ मार्चचा भूकंप

नमस्कार मित्रांनो....
जपानच्या ईशान्य भागात रिश्टर स्केल वर ९.० घटकांचा भूकंप आला... आणि तेथील लोकांवर काळ आला.... बापरे किती हानी... किती नुकसान!! तेथील फुकुशिमा व सेनदाय सारखे भाग तर टी. व्ही / इंटरनेट वर पाहूनही घाम फुटतो... संपूर्ण शहरे बेचिराख झाले... रस्त्याला भेगा पडल्या... घर वाहून गेलेत, गाड्या वाहून गेल्यात, हजारो लोक मेलेत, जे वाचले, त्यांना दुखापती झाल्यात... होत्याचे नव्हते झाले....


जपान हा चिंचोळा देश चीन आणि अमेरिकेच्या मध्ये पासिफिक महासागरात वसला आहे... तो भूकंप-क्रियाशील (high seismic active region)  भागामध्ये वसला आहे.. तसा ह्या देशाला छोटे मोठे भूकंप होताच असतात.. त्यात लोकांनाही काही भीती वाटत नाही.. येथील घरे, कार्यालये, शहरे, हे भूकंपरोधक यंत्रणेने युक्त असतात..  पण त्यांनीही कधी येवढा भयंकर भूकंप व सुनामी येईल अशी कल्पना केली नसेल...

ह्या घटनेने काही गोष्टी मात्र प्रकर्षाने समोर आल्यात...
१. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे.  माणसाने कधीही निसर्गाला ग्रंतेड पकडू नये... जेवढे जीवन निसर्ग वर्षानुवर्ष देतो तेवढेच तो काही क्षणातच परत घेऊ शकतो..... माणसाने सदैव सगळ्यांत खराब गोष्टीसाठी तयार असावे. आपण खूप प्रगती केली आहे व निसर्ग आता आपल्या ताब्यात आहे अशा गमजा तर मुळीच करू नयेत.
२. जपानने ज्या धीराने व थंड डोक्याने परिस्तिथी हाताळली आहे, ते शिकण्यासारखे आहे. जपानने उत्तम प्रशासनाचा एक आदर्शाच आपल्या समोर ठेवला आहे असे मला वाटते. प्रशासनाची कुठे उगाच गोंधळ नाही, मारामार नाही... आलेल्या परिस्तिथीतून समोर असलेल्यान पैकी योग्य मार्ग पत्करून आपले काम केले आहे. अनु उर्जेच्या भट्टीतून येवू शकणारा धोका वेळीच ओळखून त्यांनी लगेच अमेरिकेला सांगून जड पाणी (जे अनु-भट्टीत उपयोग केले जाते ), ते वेळीच मागून घेतले. शिवाय आपले सर्व पर्याय उघडे ठेवून तयारी केली...
अशा परीस्तीथित योग्य धोका ओळखून, शेवटी समुद्री पाणी भट्टीमध्ये फेकणे, तेही विनाविलंब, हेही नसे थोडके...  हे  आपण करू शकलो असतो का ह्याबद्दल मलातरी शंका वाटते..  मुंबईतील ५ जुलैच्या पावसातच पूर्ण मुंबई शहर अक्षरशः थांबून गेले होते...  त्या दिवशी मी संपूर्ण रात्र बेस्ट च्या बस मध्ये बसून काढली पण मला कुठेहि पोलीस किंवा सरकारी यंत्रणा काम करतांना दिसली नाही.. आम्हीच लोक व आजूबाजूचे राहणारे (अगदी बहुसंख्येने मराठी लोक) लोकच अडकलेल्या लोकांना चहा, सामोसे, वाद पाव, वाटत होते.. ते पाहून आम्हीही काही जन, आजूबाजूला असलेल्या म्हातार्या लोकांना आधी ते देऊन व त्यांना काही लागल्यास मदत करून कसेतरी रात्र काढली...

हे सर्व पाहून, मला तरी खरोखर असे वाटते कि सरकारने जैतापुराला अनु-प्रकल्प उभारू नये.. आपल्याला विजेची खूप गरज आहे व अनु-उर्जा ही एक स्वच्छ उर्जा आहे, हे सर्व ठीक आहे, पण आपल्याजवळ अशा गोष्टी झाल्यास त्याला समर्थपणे तोंड देणारी यंत्रणा नक्कीच नाही व ती नजीकच्या भविष्यात होणारही नाही... त्यैवजी आपण सौर उर्जा, वायू उर्जा व जल उर्जेच्या माध्यमातून आपली गरज भागविण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते.. हे सर्व पर्याय खूपच खर्चिक व जास्त काळ घेणारे आहेत, हे नक्कीच.. पण तरीही तो पर्याय आतातरी सगळ्यांना मान्य असेल असे वाटते.. नाही का?
चला मी आता थांबवतो... परमेश्वराने जपानला मदत करावी व जपानी लोकांची अजून जास्त परीक्षा पाहू नये...

आभार,
अकोलकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो, मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले. अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात. १. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भि...