मुख्य सामग्रीवर वगळा

मराठीतील काही मस्त ब्लॉग्स !!

मित्रांनो,

मी काही वारंवार लिहिणारा ब्लॉगर नाही हे तुम्हाला कळलंच असेल. तरी ज्यांना मराठी ब्लॉग्स वाचण्याची आवड आहे त्यांच्या साठी आज काही इतर सुंदर मराठी ब्लॉग्स बद्दल इथे माहिती आणि दुवे देत आहे. ते बघा, वाचा आणि आवडल्यास इथे कंमेंट करा!

१. सोप्या मराठी भाषेतून बिझनेस, तंत्रज्ञान आणि करिअरसाठी उपयुक्त  ऑनलाईन कोर्सेस शिकण्याचे एकमेव आपल्या हक्काचे ठिकाण  - नेटभेट 

२. इतिहासाबद्दल मराठी ब्लॉग : इतिहासाची सुवर्णपणे 

३. आपल्या भोवताली घडणाऱ्या गोषीतींबद्दल सम्यक लेखन आणि प्रतिक्रिया : सम्यक भान 

४. पुष्कळ वेगवेगळ्या गोष्टींवर माहिती आणि उपयुक्त माहिती असलेला ब्लॉग : मिसळपाव 

ह्यात लेखमाला, पाककृती, भटकंती आणि इतर प्रकारांवर भरपूर  लेख आणि माहितीचा खजिना आहे.

५. मस्त चविष्ट आणि छान पाककृतींची बघा : चकली  

६. भरपूर सामान्य ज्ञान आणि उपयुक्त माहितीसाठी चाळा  : मराठी वारसा

७. वेगवेगळ्या मराठती कथा आणि किस्स्यांसाठी बघा : मराठी भुंगा     .
खूपच छान आणि मस्त कथा इथे तुम्हाला वाचायला मिळतील !


ध्यानवाद !

आपला होबासराव !

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो, मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले. अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात. १. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भि...