श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!
नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय.
श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे। आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक मोठा उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते।
पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराकडे धावत असतात। अकोल्यात पूर्णा मायीचे पाणी आणून शिव शंकराला त्या पवित्र पाण्याने अभिषेक करण्याची प्रथा आहे। त्याला इथे कावड उत्सव असे नाव आहे। ह्यामध्ये श्रावणातील प्रत्येक सोमवारी इथून 20 किमी वर असलेल्या गांधीग्राम इथून पूर्ण नदीचे पाणी खांद्यावर कावडीने आणून राजेश्वाराला अभिषेक करतात. त्यात अकोला व परिसरातील 100 पेक्षा अधिक कावड संघ सहभागी होतात।
वाटेत आणि देवळात ह्या कावडधाऱ्यांना चहा, प्रसाद, वैद्यकीय सेवा दिल्या जातात। हा उत्सव अकोलेकरांच्या मनात साठविलेला असतो।
अकोल्यातील राज्राजेश्वाराचे मंदिर हे पुरातन असून 600-700 वर्षांपूर्वीपासून असलेले सांगितल्या जाते। शिव पिंड सुद्धा जुनी खडकात कोरलेली आहे। ह्याबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे। पूर्वी मोर्णा नदीकाठी आणि मंदिराच्या शेजारी असलेल्या किल्ल्यात अकोलसिंह नावाचा राजा राहत होता। त्यावेळेस त्याची पत्नी राजराजेश्वराची भक्त होती। ती दररोज सुर्योदयापूर्वी अंधारातच किल्ल्याबाहेर पडून महादेवाची पूजा करण्यासाठी जात असे। राजाला रोज ही सकाळी न सांगता बाहेर जात असल्यामुळे संशय आला आणि एके दिवशी रागाने तो पाठलाग करू लागला त्या दिवशी ती महादेवाच्या मंदिरात जात असल्याचे बघून तो संतापला आणि तिला मारण्यासाठी मागे धावला. राणी घाबरून राजेश्वराच्या धावा करू लागली। तेंव्हा तिची प्रार्थना ऐकून तिला वाचवण्यासाठी आपल्या पिंडीचे 2 भाग केले आणि राणीला आपल्यात सामावून घेतले. त्यात उडी मारतांना राणीच्या डोक्याचे काही केस खूप दिवासंपार्यता पिंडीच्या अर्ध्यातून दिसत होते असे म्हणतात।
असा हा राजराजेश्वर सर्व भक्तांवर दया करणारा आणि त्यांच्या अडचणीच्या वेळेस त्यांना धावून येणारा देव आहे अशी सर्व अकोलेकारांची श्रद्धा आहे।
तुम्हाला श्रावणात श्री राजराजेश्वराच्या दर्शनाला यायचे असल्यास अकोल्यात तुम्हाल रेल्वे, बस, खाजगी गाडीने पोहोचता येते। अकोला हे मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर मध्य रेल्वे मध्ये आणि सिकंदराबाद - इंदोर ह्या दक्षिण मध्य रेल्वे ने जोडलेले आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, नांदेड इ. ठिकाणांवरून सरळ ट्रेन्स आहेत. तेंव्हा आमच्या राज राजेश्वराच्या दर्शनाला नक्की या आणि इथला कावड उत्सव अनुभवा .
जय श्री राजराजेश्वर!!
चला, ठीकाय,
अकोलकर


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा