मुख्य सामग्रीवर वगळा

मोर्णा स्वच्छता मिशन : एक नवीन उर्जावान प्रयोग

हॅलो मित्रांनो,

मी बरेच दिवसानंतर, नव्हे वर्षानंतर परत आलोय. मधला काळ खूप घडामोडींचा होता. मी यु एस ए ला जाऊन, राहून आलो. खूप खूप काम केल. कंपनीच्या आणि माझ्या खराब काळात परत आलो.
काम आता  आहे... असो...

काही दिवसांपासून मनाला एक खूप प्रसन्न करणारी गोष्ट घडली / घडतेय. अकोलकर एकत्र येऊन मोर्णा स्वच्छता मिशन राबवतायत. आणि यशस्वी पाने राबवतायत....
नवीन जिल्हाधिकारी श्री. आस्तिक कुमार पांडे. आणि आमदार श्री. रणजित पाटील यांनी एक नवीन कल्पना साकारली. जलकुंभी आणि काचार्यानी तुंबलेली अकोल्याची जीवनवाहिनी मोर्णा नदीला स्वच्छ करायची, तिला पुन्हा जिवंत करायची.





मागच्या ५ सप्ताहांपासून सुरु झालेली हे कार्य बघता बघता मोठे झाले. आधी राजकारणी, कार्यकर्ते आणि शासकीय कर्मचारांपासून सुरु झालेल्या ह्या कार्याला हळू हळू सामान्य नागरिक हात लावू लागले आहेत.

एवढेच नाही तर श्री. मोदींच्या मन कि बात मध्ये अकोल्याच्या नदी स्वच्छता कार्यक्रमाचा आणि सर्व नागरिकांनी उस्फूर्तपणे दिलेल्या मदतीचा उल्लेख केला. संपूर्ण महाराष्ट्रात ही गोष्ट बोलल्या गेली, सर्व वर्तमान पार्टरमध्ये ह्याविषयी लेख लिहून आले.



सामान्य अकोलेकरांना खूप खूप दिवसानंतर आपल्या शहराविषयी आणि आपलय शहरातल्या नदी विषयी आभिमान वाटलं. प्रथमच अकोला शहर आपण मोठे केले पाहिजे, स्वच्छ केले पाहिजे असे वाटले. आपल्या स्वतःच्या शहराविषयी आपुलकी वाटली.





अजूनही हे कार्य चालू आहे, आणि जिल्हाधिकारी साहेब हे कार्य पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाहीत. प्रत्येक हप्त्याच्या शनिवारी अकोलकर जमतात आणि मोर्णा नदीचा एकेक भाग स्वच्छ करतात.
चला, ह्या सगळ्यांना आपल्या शुभेच्छा देउयात.... आणि आपण जर अकोल्यात आलात तर नक्कीच शनिवारी येऊन ह्या कार्याला आपला हात लावा, ही विनंती....

आपला,
होबासराव . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो, मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले. अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात. १. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भि...